शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

विरोधकांनी केली पराभवाची मानसिक तयारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 5:27 AM

एक्झिट पोलमुळे अस्वस्थता

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या तक्रारी, तसेच व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागण्या आणि विविध एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर पक्ष कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे नेत्यांकडून सतत केलेले आवाहन पाहता, विरोधी पक्षांनी आताच पराभवाची मानसिक तयारी ठेवली असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

काँग्रेस व सारेच विरोधी पक्ष ईव्हीएमविषयी तक्रारी करीत आले आहेत. यंत्रातील मतांची व्हीव्हीपॅट पावतीशी पडताळणी करावी, ही मागणीही केली, पण ती मान्य झालेली नाही. ईव्हीएमविषयीचे आक्षेपही मान्य झाले नाहीत. तरीही काँग्रेस व विरोधी पक्ष निकालाला एक दिवस शिल्लक असताना करतात, याचा अर्थच त्यांचा पराभव अटळ आहे, असे भाजप नेतेही सांगू लागले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, या पोलने खचून जाऊ नका, असे आवाहन बुधवारी कार्यकर्त्यांना केले, तसेच आवाहन सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केले होते.

एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. आॅस्ट्रेलियातील ५६ एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे निघाल्याची माहिती काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली. चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावताना केंद्रामध्ये काँग्रेसच्या आघाडीचे व आंध्र प्रदेशात तेलगू देसमचेच सरकार येईल, असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राजदचे तेजस्वी यादव या नेत्यांनीही एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे खरे ठरते कीएक्झिट पोल खरे ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जवळपास सर्वच एक्झिट पोलनी रालोआला २८६ ते ३0८ जागा (स्पष्ट बहुमत) तर यूपीएला ११३ जागा, तर पक्षांना ११५ जागांचा अंदाज दिला आहे. यूपीए व अन्य पक्ष मिळून २२८ होतात. ही संख्या बहुमतास पुरेशी नाही.

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल