शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फिर एक बार मुख्यमंत्रिपदी केजरीवाल; तब्बल ७० टक्के दिल्लीकरांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 08:45 IST

आम आदमी पार्टीला ५९ जागा मिळण्याचा अंदाज

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी नोंदवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे. तर मागील निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी व्होटरनं ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपची सत्ता येईल, असा अंदाज यामधून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी तब्बल ७० टक्के दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांनाच पसंती दिली आहे. १ ते ६ जानेवारी दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एबीपी न्यूज-सी व्होटरनं १३ हजार ७६ लोकांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेतला. यातील बहुसंख्य जणांनी आप गेल्या निवडणुकीप्रमाणेच शानदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात ८ जागांची घट होईल असा अंदाज आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीला ५९ जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदाही दुहेरी आकडा गाठता येणार नाही. देशात सत्ता असलेल्या भाजपाला दिल्लीत केवळ ८ जागा मिळू शकतील. याचा अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची कामगिरी किंचित सुधारेल. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकणारी काँग्रेस यंदा ३ जागा जिंकू शकेल. एकूण ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत बहुमत गाठण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. हा आकडा यंदाही आम आदमी पार्टी अगदी सहज गाठेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांनाच पसंती दिली आहे. केजरीवालच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७० टक्के लोकांनी व्यक्त केला. तर ११ टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांना पसंती दिली. काँग्रेसच्या अजय माकन यांना ७ टक्के, तर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना केवळ १ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. आम आदमी पार्टीला विधानसभा निवडणुकीत ५३.३ टक्के मतं मिळू शकतात. तर लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या सर्वच्या सर्व सातही जागा दोन लाखांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत २५.९ टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसला या निवडणुकीत केवळ ४.७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस