शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

ओपिनियन पोल : गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट, काँग्रेसचा टक्का वाढला, मात्र सत्ता भाजपाकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:33 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब आज प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब आज प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे. या आोपिनियन पोलनुसार भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट होत असल्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितही गुजरातमधील सत्ता टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.हा सर्व्हे 26 ऑक्टोबर 1 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता. या ओपिनियन पोलमध्ये 200 पोलिंग बुथमधील 3 हजार 757 जणांचे मत जाणून घेण्यात आले. या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 41 टक्के तर भाजपाला 47 टक्के मते मिळतील. तर मतांचे जागांमध्ये होणारे रूपांतर पाहिल्यास काँग्रेसला 58 ते 64 जागा आणि भाजपाला 113 ते 121 जागा मिळतील. तर इतरांना 1 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 48 टक्के मते  आणि 116 जागा मिळाल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आगामी मतदानात मतांच्या टक्केवारीत वर्तवण्यात आलेली लक्षणीय घट भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीने याआधी आॉगस्टमध्ये घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाला 144 ते 152 तर काँग्रेसला 26 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

ओपिनियन पोलमधील महत्त्वाचे मुद्दे 

दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला आघाडी35 विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला 51 टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 33 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. आदिवासीबहुल असलेल्या दक्षिण गुजरातमध्येही भाजपासाठी अनुकूल वातावरण आहे. पारंपरिक व्होटबँक असलेल्या आदिवासींवरील काँग्रेसची पकड ढिली झाल्याचे संकेत ओपिनियन पोलमधून मिळत आहेत.  सौराष्ट्रमध्ये कांटे की टक्कर पटेलांचा बोलबाला असलेल्या सौराष्ट्रमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. विधानसभेच्या 54 जागा असलेल्या सौराष्ट्रमध्ये भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी 42 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सौराष्ट्रमध्ये पाटीदारांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसताना दिसत आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाविरोधात उघड भूमिका घेतल्याने सौराष्ट्रमध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. 

उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसची मुसंडी  उत्तर गुजरातमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याचा अंदाज आहे. एकूण 53 जागा असलेल्या उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसला 49 टक्के तर भाजपाला 44 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असलेल्या उत्तर गुजरातमध्ये शेतकरी वर्ग भाजपाविरोधात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील मतदार परिवर्तन घडवण्यास उत्सुक आहे. 

मध्य गुजरातमध्ये भाजपाचा बोलबाला 40 जागा असलेल्या मध्य गुजरातमध्ये भाजपाला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. येथे भाजपाला 54 टक्के तर काँग्रेसला 38 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मध्य गुजरातमधील शहरी मतदार मात्र भक्कमपणे भाजपाच्या मागे उभे आहेत.  गुजरातमध्ये महिला भाजपाच्या बाजूने या ओपिनियन पोलमधून महिलांचा कल भाजपाकडे दिसून येत आहे. सुमारे 50 टक्के महिला भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचा अंदाज आहे. तर 39 टक्के महिलांनी काँग्रेसला पसंती दिली आहे.    

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी