शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 07:50 IST

आयआयटी पदवीदान सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांचे विदेशी माध्यमांना आव्हान

चेन्नई : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ भारताने अचूक हल्ले करून नष्ट केले. त्यानंतर भारतात काडीचे जरी नुकसान झाले असेल तर ते दर्शविणारी छायाचित्रे आम्हाला दाखवा, असे आव्हान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी दिले. 

चेन्नईतील आयआयटी मद्रासच्या ६२व्या पदवीप्रदान समारंभात त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’सह अन्य विदेशी प्रसारमाध्यमांची नावे घेऊन टीका केली.  यासह परदेशी माध्यमांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तानातील सरगोधा, रहिम यार खान, चकलाला, रावळपिंडी इत्यादी ठिकाणी असलेल्या १३ हवाई तळांचे भारताच्या हल्ल्यामुळे जे नुकसान झाले, त्याची छायाचित्रे माध्यमांनी दाखविली. मात्र, भारतात असे काही नुकसान झाले, असे एकही छायाचित्र विदेशी प्रसारमाध्यमांना दाखविता आले नाही.  

ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर’डोवाल यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ब्राह्मोस क्षेपणास्त्र, हवाई नियंत्रण आणि कमांड सिस्टिम आदी यंत्रणांनी परिणामकारक कामगिरी केली. नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. हे तळ सीमेजवळ नव्हे, तर पाकच्या अंतर्भागात होते. त्या प्रत्येक लक्ष्यावर भारताने अचूक हल्ला केला.

ऑपरेशन सिंदूर अवघ्या २३ मिनिटांत पूर्ण झालेऑपरेशन सिंदूर अवघ्या २३ मिनिटांत पूर्ण झाले. या कारवाईबद्दल आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मतानुसार लिहिले. मात्र, उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे खरी गोष्ट सांगतात. १० मेपूर्वी आणि त्यानंतर पाकमधील १३ हवाई तळांची परिस्थिती काय होती, हे या छायाचित्रांवरून नीट कळते.

‘भारताने अडीच वर्षांत  ५-जी केले विकसित’अजित डोवाल यांनी सांगितले की, युद्ध आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर संबंध खूप महत्त्वाचा आहे. देशाने आपली गरज भागवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. आयआयटी मद्रास व खासगी क्षेत्राने ५-जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठे योगदान दिले. भारताने अवघ्या अडीच वर्षांत ५जी विकसित केले. त्यासाठी चीनने १२ वर्षे घेतली व ३०० अब्ज डॉलर खर्च केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरAjit Dovalअजित डोवाल