शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:21 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानने भारताची काही विमानं पाडल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र भारतीय संरक्षण दले आणि सरकारकडून याला दुजोरा मिळत नव्हता. त्यावरून राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले होते. दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी विमानांच्या झालेल्या नुकसानाबाबत सिंगापूरमध्ये केलेल्या विधानामुळे देशाच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी देशाबाहेर जाऊन माहिती देण्याआधी ही माहिती संरक्षण मंत्र्यांनी देशातून दिली पाहिजे होती, तसेच झालेल्या नुकसानीबाबत राजकीय पक्षांना सांगितले पाहिजे होते, असेही रमेश यांनी म्हटले आहे. 

सिंगापूरमध्ये आयोजित शांग्री-ला डायलॉक सिक्युरिटी समिटमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षावेळी भारताच्या लढाऊ विमानांचं नुकसान झाल्याचं मान्य केलं होतं. मात्र या कारवाईदरम्यान, किती विमानांचं नुकसान झालं, हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. ते म्हणाले होते की, नुकसान किती झालं हे महत्त्वाचं नाही, पण काय चुका झाल्या, हे महत्त्वाचं आहे. तसेच किती नुकसान झालं याचे आकडे महत्त्वाचे नाहीत, तर त्यानंतर काय झालं हे महत्त्वाचं आहे, असेही सीडीएस चौहान म्हणाले होते. 

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूरात सूर मिसळत जयराम रमेश यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत कारगिल रिव्ह्यू कमिटीप्रमाणे एक तज्ज्ञांची समिती तयार करून भारताच्या संरक्षविषयक तयारीची समीक्षा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आम्हाला जनरल चौहान यांच्या सिंगापूरमधून  आलेल्या वक्तव्यांपर्यंत वाट का पाहावी लागली. जनरल चौहान यांनी जे मुद्दे मांडले ते महत्त्वाचे आहेत, तसेच ते केवळ लष्करी रणनीतीच नाही तर परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण आणि मुत्सद्देगिरीवरही परिणाम करणारे आहेत.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस