शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:41 IST

Operation Sindoor: 'जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत.'

Operation Sindoor: पहलगाम दहशथवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गतपाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या घटनेत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे सुमारे शंभर दहशतवादी ठार झाले. त्या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतातील 15 शहरांवर हल्ले केले, पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे हल्ले परतून लावली. या बाबत परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली, यात परराष्ट्र सचिवांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आणि पाकिस्तानची पोलखोलही केली.

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र आहेपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असतानाही त्याची जबाबदारी नाकारत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. दहशतवाद्यांच्या जनाज्यात पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी आणि नेते मंडळी जातात. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंधही मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची पाकिस्तानची मागणी देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पठाणकोट आणि मुंबई हल्ल्यांबाबत भारताने सर्व पुरावे दिले पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही.

पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना संरक्षण देतोपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीमेपलीकडून आपल्याविरुद्ध बरीच चुकीची माहिती दिली जात आहे, वाढत्या तणावाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पण पहिली गोष्ट म्हणजे पहलगाममधील हल्ला हा तणाव वाढण्याचे पहिले कारण आहे, भारतीय लष्कराने काल त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) गट हा लष्कर-ए-तैयबाचा एक सुप्रसिद्ध मोर्चा आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) देत आहोत. टीआरएफबद्दल अपडेट्स सतत दिले जात आहेत. विक्रम मिस्री यांनी एक धक्कादायक खुलासा केला की जेव्हा UNSC च्या निवेदनात TRF चे नाव समाविष्ट करण्याची वेळ आली तेव्हा फक्त पाकिस्ताननेच त्याला विरोध केला आणि ते नाव काढून टाकले. हे स्पष्ट संकेत आहे की पाकिस्तान अजूनही या दहशतवादी गटांना संरक्षण आणि पाठिंबा देत आहे.

आम्ही फक्त वाढत्या तणावाला प्रतिसाद देत आहोतविक्रम मिस्री पुढे म्हणतात, जेव्हा UNSC मध्ये पहलगामबद्दल चर्चा सुरू होती, तेव्हा पाकिस्तानने TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) च्या भूमिकेला विरोध केला होता. टीआरएफने एकदा नाही तर दोनदा हल्ल्याची जबाबदारी घेतल्यावर पाकिस्तानने हे केले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी काल आणि आज स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताचा प्रतिसाद अचूक आणि मोजमापाने दिला जाणारा आहे. हा विषय वाढवायचा आमचा हेतू नाही. आम्ही फक्त वाढत्या तणावाला प्रतिसाद देत आहोत. कोणत्याही लष्करी स्थळांवर हल्ला झाला नाही. आम्ही फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. 

पाकिस्तान जगाची दिशाभूल करत आहेपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पुनरुच्चार केला की, भारताची कारवाई दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यापुरती मर्यादित होती; आम्ही नागरिकांवर किंवा लष्करी आस्थापनांवर हल्ला केला नाही, तर फक्त दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी येथे दहशतवादी नसल्याचे केलेले विधान पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. पाकिस्तान अजूनही जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे.

लादेनला शहीद कोणी म्हणले..?

ओसामा बिन लादेन पाकिस्तानत सापडला, तिथेच मारला गेला अन् पाकिस्तानने त्याला 'शहीद' म्हटले. पाकिस्तानने "संयुक्त चौकशी" करण्याची ऑफर पुन्हा एकदा वेळ वाचवण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक रणनीती आहे. 26/11 आणि पठाणकोट सारख्या हल्ल्यांच्या तपासात भारताने सहकार्य केले, परंतु पाकिस्तानने नाही. जर पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला, तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. पाकिस्तानकडून पुढील कोणत्याही कृतीला योग्य प्रतिसाद दिला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत