Operation Sindoor: भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारताही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हमजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोर आणि सियालकोटवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी अंधार पडताच पाकिस्तानने सीमेजवळील भारतातील विविध शहरांमध्ये 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानने फक्त राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 70 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.
मीडिया रिपोर्सनुसार, प्रत्युत्तरात भारताने लाहोरमध्ये असलेले पाकिस्तानचे AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) नष्ट केले आहे. याशिवाय भारताने पाकिस्तानच्या फैसलाबाद, सरगोधा, मुलतान आणि सियालकोट शहरांमधील संरक्षण प्रणालीदेखील नष्ट केली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हेतूला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या सर्व संरक्षण यंत्रणा सध्या पूर्णपणे सक्रिय आहेत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पाकिस्तानची 3 विमाने पाडली, पायलट ताब्यातपाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने पाकची 3 लढाऊ विमाने पाडली. भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये दोन JF-17 आणि एक F-16 यांचा समावेश आहे. तसेच, यापैकी एका विमानातील पाकिस्तानी वैमानिकाला पकडण्यात आल्याची माहितीही मिळत आहे.