पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर विनय नरवालची पत्नी हिमांशी नरवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे. आज आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने दहशतवाद्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे आणि हे सिद्ध केलं आहे की, आता पाकिस्तानलाही २६ भारतीय कुटुंबांना झालेल्या वेदनांची जाणीव झाली असेल असं हिमांशी नरवालने म्हटलं आहे.
२२ एप्रिलच्या त्या भयानक रात्रीची आठवण करून देताना हिमांशी म्हणाली की, "जेव्हा हल्ला झाला तेव्हा लग्नाला फक्त ६ दिवस झाले होते. त्याने दहशतवाद्यांना दयेची याचना केली होती. पण दहशतवाद्यांनी सांगितलं की याचं उत्तर मोदींकडून घ्या. आज लष्कर आणि मोदी सरकारने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला याचा आम्हाला आनंद आहे."
"विनय आणि इतर २६ भारतीय आता आपल्यात नाहीत हे देखील दुःखद आहे. त्या भ्याड हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती, जी आता पूर्ण करण्यात आली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आणि अश्लील टिप्पण्या करण्यात आल्या, ज्यामुळे खूप वाईट वाटलं. हल्ल्यानंतर ती दोन तास एकटीच लढली आणि इतर २६ महिला होत्या, ज्यांना आशा होती की सरकार आणि सैन्य त्यांच्या जखमा भरून काढतील."
"आज केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे." हिमांशी नरवाल हनिमूनसाठी पहलगामला गेली होती. पती लेफ्टनंट विनय नरवालची दहशतवादी हल्ल्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विनय हा कर्नाल शहरातील सेक्टर ७ चा रहिवासी होता. १६ एप्रिल रोजी त्यांचं लग्न झाले, १८ एप्रिल रोजी रिसेप्शन झालं आणि २२ एप्रिल रोजी विनय नरवालची हत्या झाली.