शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:01 IST

Discussion on Operation Sindoor in Parliament: विरोधक सातत्याने सरकारकडे ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते.

Discussion on Operation Sindoor in Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होईल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट चालेल. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासही सहमती दर्शविली आहे.

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा रिजिजू म्हणाले की, अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाईल. प्रत्येक अधिवेशन विशेष आहे आणि आम्ही ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. सरकारला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. आम्ही विरोधकांशी याबाबत चर्चा केली, आशा आहे की, या बाबतीत सर्वजण एकसारखी भूमिका घेतील. पावसाळी अधिवेशनात नियमांनुसारच सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

150 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे नंबर, ज्योतीसोबत पाकचा दौरा अन्..; हेर जसबीर सिंगची कुंडली

ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन नाहीएकीकडे विरोधक सतत सरकारकडे ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते. मंगळवारी १६ विरोधी यासाठी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले होते. पण, आता सरकारने पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. म्हणजेच, विरोधकांच्या सततच्या मागणीनंतरही ऑपरेशन सिंदूरवर कोणतेही विशेष अधिवेशन होणार नाही. जी काही चर्चा होईल, ती सर्व पावसाळी अधिवेशनातच होईल.

1948 मध्ये PoK, 1996 मध्ये पाकला मोस्ट फेवर्ड नेशन...BJPने काँग्रेसच्या शरणागतींचा पाढा वाचला

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा