शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूर इफेक्ट...! आता खुद्द इस्रायल भारताकडून खरेदी करणार शस्त्रास्त्रे, झाला मोठा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:38 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने मोठे शौर्य दाखवले आणि काही तासांतच पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशी शस्त्रे वापरली आणि काही तासांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पडले.

जगात दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेला आणि सोसत असलेला इस्रारायल आता भारताकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणार आहे. इस्रायल हा एक असा देश आहे, ज्याला इस्लामिक जग आपला सर्वात मोठा शत्रू मानते. हा तोच इस्रायल आहे जो गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताच्या बाजूने उभा राहिला होता. या हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हाही इस्रायल भारताच्या समर्थनात ठामपणे उभा राहिला. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करणे हा भारताचा अधिकार आहे आणि भारताने तसे करायला हवे. भारत हा दहशतवादाची मोठी झळ बसलेला देश आहे, असे इस्रायलने म्हटले होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने मोठे शौर्य दाखवले आणि काही तासांतच पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशी शस्त्रे वापरली आणि काही तासांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पडले. पाकिस्तानची सर्व चिनी शस्त्रे निष्प्रभ झाली. या कारवाईनंतर भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आकाश संरक्षण प्रणाली आणि इतर शस्त्रांना जागतिक मान्यता मिळाली आहे.

भारतातील शस्त्रास्त्रांची मागणी वाढलीयानंतर, जगाच्या दृष्टीने भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच आता इस्रायलही भारताकडून शस्त्रे खरेदी करत आहे. महत्वाचे म्हणजे, इस्रायलची शस्त्रे आणि संरक्षण व्यवस्था जगभरात प्रसिद्ध आहेत. याच इस्रायलने भारताच्या निबे लिमिटेड कंपनीसोबत १७.५ कोटी डॉलर्स म्हणजेच १५० कोटी रुपयांचा रॉकेट लाँचर करार केला आहे. NIBE ही देशातील एक आघाडीची कंपनी आहे जी महत्त्वाच्या संरक्षण प्रणालींचे उत्पादन करते. त्यांनी इस्रायलकडून मिळालेल्या या खरेदी ऑर्डरची घोषणा केली आहे. खरे तर ही एक छोटी ऑर्डर आहे. मात्र हिचे महत्व फार मोठे आहे. जर इस्रायलसारखा देश भारताच्या शस्त्रांवर विश्वास दाखवत असेल, तर जगभरात भारताच्या शस्त्रांवरील विश्वास वाढेल आणि येणाऱ्या काळात त्याचा व्यापक परिणाम दिसून येईल.

 

टॅग्स :Israelइस्रायलIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर