शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:51 IST

Operation Sindoor: जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत घेतलेला या हल्ल्याचा बदला, यावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

जयराम रमेश म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मागच्या १८ महिन्यात चार हल्ले केले आहेत. आमचे खासदार सध्या इकडे तिकडे फिरत आहेत आणि हे दहशतवादीही इकडे तिकडे फिरत आहेत, असं विधान त्यांनी केलं. त्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जयराम रमेश यांनी आमच्या लोकप्रतिनिधींना दहशतवाद्यांच्या रांगेत उभं केलं आहे. ही काँग्रेसची तीच मानसिकता आहे जी भारताच्या मुत्सद्देगिरी आणि लष्करी प्रयत्नांना कमकुवत करते. आता संसदेने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

शाहजाद पूनावाला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख किरकोळ असा करून जवानांच्या शौर्याचा अपमान करतो. तसेच जागतिक स्तरावर भारत करत असलेल्या प्रयत्नांचीही खिल्ली उडवतो.

दरम्यान, आपल्या विधानावरून वादाला तोंड फुटल्यावर जयराम रमेश म्हणाले की, माझा हेतू केवळ भाजपाला पिंजऱ्यात उभं करण्याचा होता. भाजपा दहशतवाद्यांना सोडून काँग्रेसवर हल्ले करत आहे. खरंतर जिथून धोका आहे तिथे हल्ला झाला पाहिजे, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला. मात्र भाजपाने जयराम रमेश यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपा