शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 06:24 IST

लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, छोर, कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या साहाय्याने अत्यंत भेदक हल्ले गुरुवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: पाकिस्तानने भारतातील १५ ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तेथील लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, छोर, कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या साहाय्याने अत्यंत भेदक हल्ले गुरुवारी केले. इस्रायलने बनविलेले हारोप ड्रोन बराच काळ हवेत घिरट्या घालून योग्य क्षणी हल्ला करू शकतात.

या हल्ल्याच्या प्रतिकार करण्यासाठी भारताने रशियाकडून मिळविलेल्या एस-४०० या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रप्रणालीचा उपयोग केला व पाकिस्तानचा भारतीय शहरांवर हल्ले करण्याचा डाव उधळून लावला. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने भारतीय सैनिकी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी लाहोरसह पाकिस्तानमधील काही ठिकाणी असलेल्या हवाई संरक्षण यंत्रणांवर अचूक प्रहार केला व त्या यंत्रणा उ‌द्ध्वस्त केल्या.

लक्ष्य शोधून योग्य त्या क्षणी स्फोट करते आत्मघाती हारोप हे इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या (आयएआय) मिसाइल डिव्हिजनने विकसित केलेले आत्मघाती ड्रोन आहेत. ते पारंपरिक क्षेपणास्त्र व मानवरहित विमान यांचे मिश्रण आहे. हे ड्रोन दीर्घकाळ हवेत उड्डाण करू शकते, तसेच लक्ष्य शोधून योग्य त्या क्षणी स्फोट घडविते. ते शत्रूच्या रहार स्टेशन, टैंक, कमांड सेंटर, पुरवठा केंद्र यासारख्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. हारोपचे नियंत्रण मानवी हस्तक्षेप असलेल्या प्रणालीच्या माध्यमातून होते. त्यामुळे आवश्यकता भासल्यास ते परत बोलाविता येते.आयपीएलवर युद्धाचे ढग; धर्मशाळातील सामना थांबवलाभारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने आयपीएलवर युद्धाचे ढग पसरले असून पुढील सामन्यांबद्दल शुक्रवारी निर्णय होणार आहे. गुरुवारचा धर्मशाळातील दिल्ली विरुद्ध पंजाब सामना ब्लॅक आऊटमुळे थांबवण्यात आला.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान