शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:42 IST

गृहमंत्री अमित शाहांनी सर्व अधिकाऱ्यांना देशातील अंतर्गत सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Operation Sindoor: पाकिस्तान समर्थिक दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकिस्तानात 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी बुधवारी (7 मे, 2025) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना केल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना आश्रय देण्यासाठी बंकर तयार ठेवण्यासही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच, सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देशही दिले आहेत. गृहमंत्र्यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला असून, सर्व उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कडक नजर ठेवण्यासही सांगितले आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत गृहमंत्र्यांचे निर्देशगृहमंत्र्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' हे पहलगाममधील निष्पाप लोकांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेला प्रतिसाद असल्याचे वर्णन केले. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारत आणि देशातील नागरिकांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आणि दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकऑपरेशन सिंदूरनंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (7 मे) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. याशिवाय ते सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठकही घेणार आहेत. यात सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानAmit Shahअमित शाह