शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:11 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला अनेक देशांचा पाठिंबा मिळतोय.

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या इराण आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र भारत दौऱ्यावर आले आहेत. सौदीचे मंत्री अदेल अलजुबैर यांनी गुरुवारी (8 मे 2025) भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यावर भर देण्यात आला. 

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील आधीच ताणलेले संबंध आणखी बिकट झाले असताना अलजुबैर भार दौऱ्यावर आले आहेत. या भेटीनंतर जयशंकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, 'आज सकाळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र अदेल अलजुबैर यांच्याशी भेट झाली. यादरम्यान दहशतवादाशी लढण्याबाबत चर्चा झाली.'

दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हेदेखील काल मध्यरात्रीच्या सुमारास पूर्वनियोजित भारत दौऱ्यावर आले आहेत. जयशंकर यांनी अब्बास अरघची यांना थेट सांगितले की, 'आमचा हेतू परिस्थिती बिघडवण्याचा नाही, परंतु जर आमच्यावर लष्करी हल्ला झाला, तर भारत पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल यात शंका नाही.' अरघगी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.

भारताची पाकिस्तानवर स्ट्राईकपहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा अड्डा असलेल्या मुरीदकेचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये सुमारे शंभर दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIranइराणsaudi arabiaसौदी अरेबियाS. Jaishankarएस. जयशंकर