शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:28 IST

श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

जम्मूमधील भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ‘ऑपरेशन महादेव’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळ एक संशयास्पद संभाषण ऐकण्यात आलं आणि त्यानंतर ‘ऑपरेशन महादेव’ सुरू करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, कारण या संदेशातून हे लक्षात आलं होतं की वापरण्यात आलेलं उपकरण २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याशी संबंधित आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजता टी८२ अल्ट्रासेट सक्रिय झालं. टी८२ हे एक अत्यंत दुर्मिळ, एन्क्रिप्टेड संवाद उपकरण आहे. या उपकरणातून सिग्नल मिळाल्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा मार्ग मोकळा झाला. टी८२च्या सिग्नल्समुळे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचं नेमकं ठिकाण शोधण्यात यश मिळालं.

जवळपास ११ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा कमांडोच्या संयुक्त पथकाने तीन ‘अतिशय महत्त्वाच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना’ घेरलं आणि त्यांना ठार केलं. यात सुलेमानी शाह नावाच्या एका लष्कर-ए-तैयबा (LeT) सदस्याचा समावेश होता, जो पहलगाम हल्ल्याचा मुख्य शूटर आणि सूत्रधार असल्याचा संशय होता.

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची ओळख पटवणारहरवानच्या मुलनार परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता चकमक सुरू झाली. २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा युनिटच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत दहशतवाद्यांवर जोरदार गोळीबार केला, यात तीन सशस्त्र दहशतवादी ठार झाले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांची ओळख परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांच्यामार्फत पटण्याची शक्यता आहे, ज्यांना गेल्या महिन्यात एनआयएने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केली होती. एनआयएच्या तपासात असं समोर आलं होतं की, परवेज आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील एका हंगामी झोपडीत (ढोक) तीन सशस्त्र दहशतवाद्यांना जाणूनबुजून आश्रय दिला होता. ही माहिती एजन्सीने गेल्या महिन्यात दिलेल्या निवेदनात दिली होती.

सुलेमानी शाह पहलगाम हल्ल्याचा मुख्य संशयितपहलगाममधील एका सुंदर पार्कमध्ये २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडेवाल्याची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर सुलेमानी शाहचं नाव मुख्य संशयित म्हणून समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देखील त्याचा शोध घेत होती. एका अधिकाऱ्याच्या मते, तो पाकिस्तानी लष्कराचा माजी कमांडो असल्याचा संशय आहे. सुरक्षा दलांनी दाचीगामच्या हरवान परिसरातील दहशतवाद्यांच्या ठिकाणावरून एक एम४ कार्बाइन आणि दोन एके४७ रायफल, ग्रेनेड, दारूगोळा, तसेच खाण्यापिण्याचे सामानही जप्त केलं आहे. ठार झालेल्या इतर दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान