'ऑपरेशन लोटस माझ्या मतदारसंघापर्यंत आलंय', अरविंद केजरीवालांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:21 IST2024-12-29T19:10:01+5:302024-12-29T19:21:08+5:30

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी मतदार यादीवर आरोप केले. त्यावर आता निवडणूक आयोगाने भूमिका मांडली. 

'Operation Lotus has reached my constituency', Election Commission responds to Arvind Kejriwal's allegations | 'ऑपरेशन लोटस माझ्या मतदारसंघापर्यंत आलंय', अरविंद केजरीवालांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिले उत्तर

'ऑपरेशन लोटस माझ्या मतदारसंघापर्यंत आलंय', अरविंद केजरीवालांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिले उत्तर

Arvind Kejriwal Delhi Elections 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदारांची नाव वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले. अरविंद केजरीवाल सातत्याने हा मुद्दा मांडत असून, आता दिल्ली निवडणूक आयोगाने आरोपांना उत्तर दिले आहे. अंतिम मतदार यादी येईपर्यंत बदल होत राहतील, असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीची तारीखही सांगून टाकली. 

दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघून अरविंद केजरीवाल यांनी आधीपासूनच तयारी सुरू केली असून, उमेदवारही जाहीर केले आहेत. दिल्लीची सत्ता राखण्याचे आव्हान आम आदमी पक्षासमोर असून, केजरीवाल भाजपवर आरोप करताना दिसत आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, १५ डिसेंबर रोजी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळ्याची मोहीम सुरू झाली. ५००० मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दिले गेले. दुसरीकडे ७५०० मतदारांची नावे समाविष्ट करण्याबद्दल अर्ज दिले गेले. यामुळे माझ्या मतदारसंघात १२ टक्के मते बदलू शकतात. 

केजरीवालांनी म्हटले की, माझ्या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ६ हजार ८७३ इतकी आहे. २० ऑगस्ट ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आलेल्या बदलानंतर २९ ऑक्टोबर रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली.

निवडणूक आयोगाचे केजरीवालांना उत्तर

ज्या मतदार यादीचा उल्लेख अरविंद केजरीवाल करत आहेत, त्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने खुलासा केला. २९ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा आरखडा जारी करण्यात आला होता. त्याशिवाय २९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या अर्जांचा निपटारा २४ डिसेंबरपर्यंत करण्यात आला. १ जानेवारी २०२५ पर्यंत जे अर्ज येतील, त्यांचीही नावे समाविष्ट केली जाईल आणि अंतिम मतदार यादी ६ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे आयोगाने सांगितले. 

"ऑपरेशन लोटस आता माझ्या मतदारसंघात"  

केजरीवालांनी आरोप केला होता की, ऑपरेशन लोटस आता माझ्या मतदारसंघापर्यंत पोहोचलं आहे. निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी ते आता मतदार यादीमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हेराफेरी लोकशाहीला कमकुवत करू शकते. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारची हेराफेरी होऊ नये म्हणून त्यांनी लक्ष ठेवावे."

Web Title: 'Operation Lotus has reached my constituency', Election Commission responds to Arvind Kejriwal's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.