शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Operation Bluestar: 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला 38 वर्षे पूर्ण, अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 10:34 IST

Operation Bluestar: अमृतसरमध्ये झालेल्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला आज 38 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये 7 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

Operation Bluestar:अमृतसरमध्ये झालेल्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला आज 38 वर्षे पूर्ण होत आहेत. ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त कट्टरपंथी संघटनांनी अमृतसरमध्ये बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण परिसराला छावणीत रुपांतरित केले आहे. प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमध्ये 7 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. 1984 मध्ये याच दिवशी सुवर्ण मंदिरात लष्कराचे ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते.

अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराभोवती सर्वत्र पोलिसांचा पहारा आहे. परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. सुवर्णमंदिराच्या सुरक्षेमध्ये कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त कट्टरपंथी संघटनांनी अमृतसरमध्ये बंदचे आवाहन केल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अमृतसर बंदची हाकऑपरेशन ब्लू स्टारच्या 38व्या वर्षपूर्तीनिमित्त कट्टरपंथी संघटनांनी अमृतसर बंदची हाक दिली आहे. दल खालसा नावाच्या संघटनेनेही ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात ठिकठिकाणी पोस्टर लावले. हे पाहता अमृतसरच्या सुरक्षेला कोणीही तडा जाऊ नये म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांनी मोर्चेबांधणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसरच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या चार कंपन्यांसह सुमारे 7,000 जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय दरबार साहिबकडे जाणाऱ्या बाहेरच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

कट्टरपंथी शीख संघटनांचा मोर्चा दल खालसा, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) यांसह कट्टरपंथी शीख संघटना आणि खलिस्तान समर्थक गटांशी संबंधित सदस्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या 38 व्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी शहराकडे कूच केली. यावेळी 'आझादी मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. लॉरेन्स रोडवरील भाई वीरसिंग मेमोरिअल हॉलपासून मोर्चाला सुरुवात होताच आंदोलकांनी खलिस्तानचे झेंडे आणि फलक घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली. तसेच, यावेळी अनेकांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.

टॅग्स :Punjabपंजाबamritsar-pcअमृतसरPoliceपोलिसBhagwant Mannभगवंत मान