ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 22:19 IST2018-10-25T22:19:07+5:302018-10-25T22:19:47+5:30

लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे.

Operation All-Out: 6 terrorists killed in an encounter between Baramulla and Anantnag | ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधील बारामुला आणि अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत लष्कराने सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. बारामुला येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर अनंतनाग येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 





बारामुला जिल्ह्यात शोधमोहीम सुरू होती. त्यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या अन्य एका चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याआधी बुधवारी नौगाम येथील सुथू येथे झालेल्या चकमकीत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.

 

Web Title: Operation All-Out: 6 terrorists killed in an encounter between Baramulla and Anantnag