शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
2
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
3
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
4
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
6
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
7
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
8
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
9
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
10
महिला वाढल्या, कंपन्यांच्या चुका अन् खर्चही कमी झाला; 5000 कंपन्यांच्या डेटातून खुलासा
11
"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
12
Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, मात्र चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पटापट चेक लेटेस्ट रेट
13
मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
14
सावधान! ChatGPT आणि Geminiला चुकूनही विचारू नका 'या' गोष्टी; बसू शकतो मोठा फटका!
15
SIP Calculator: दर महिन्याला ₹५,००० जमा केले तर २० वर्षांमध्ये किती फंड तयार होईल; पटापट पाहा कॅलक्युलेशन
16
VIDEO: दिल्लीच्या मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई; बेकायदेशीर बांधकामं पाडली, दगफेकीचाही प्रकार
17
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन आता कोणत्या स्थानी?
18
"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
19
Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे पक्षांतर
20
आजारी आईसाठी सुट्टी मागितली; बॉसने दिला अजब सल्ला! महिला कर्मचाऱ्याची व्हायरल पोस्ट वाचून होईल संताप
Daily Top 2Weekly Top 5

खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 21:32 IST

या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे मेरिटच्या आधारे आरक्षित श्रेणीतील उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळू शकते असं सांगितले आहे.

नवी दिल्ली - सरकारी नोकरीत चांगले गुण मिळवून पात्र ठरलेल्या एससी, एसटी, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवाराला अनारक्षित श्रेणीतून जागा मिळण्याचा अधिकार आहे. खुल्या श्रेणीतील जागा कुठल्याही खास सामाजिक वर्गासाठी नाही. या जागा सर्वांसाठी खुल्या आहेत. त्या मेरिटच्या आधारेच भरायला हव्यात असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे. 

या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे मेरिटच्या आधारे आरक्षित श्रेणीतील उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळू शकते असं सांगितले आहे. निवड प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात मेरिटच्या आधारे यादी जारी व्हायला हवी असं कोर्टाने सांगितले. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जर आरक्षित प्रवर्गातील एखाद्या उमेदवाराला सुरुवातीच्या टप्प्यात सामान्य प्रवर्गात निश्चित केलेल्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर त्याला खुल्या यादीतून जागा मिळायला हवी. जर पुढील निवड प्रक्रियेच्या टप्प्यात त्याला अधिक गुण मिळाले तर त्याला सामान्य कोट्यातून नोकरी मिळू शकते. जर पुढच्या टप्प्यात त्याला कमी गुण मिळाले तर त्याला पुन्हा आरक्षित प्रवर्गातून जागा मिळू शकते. 

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, राखीव श्रेणीतील उमेदवारांना त्यांच्या श्रेणीमुळे वंचित ठेवले जाऊ नये. हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेविरुद्ध असेल. हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालय, राजस्थान जिल्हा न्यायालये आणि न्यायिक अकादमीमध्ये एकूण २,७५६ कनिष्ठ न्यायिक सहाय्यक आणि लिपिक ग्रेड-II पदांसाठी निवड प्रक्रियेशी संबंधित आहे. २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या या प्रक्रियेत दोन टप्पे होते. ३०० गुणांची लेखी परीक्षा आणि १०० गुणांची संगणक-आधारित टायपिंग चाचणी होती. 

मे २०२३ मध्ये लेखी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भरती आयोगाने टायपिंग परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट तयार केली. सामान्य श्रेणीसाठी कट-ऑफ सुमारे १९६ गुणांचा होती तर अनेक राखीव श्रेणींसाठी कट-ऑफ खूप जास्त होता, काही प्रकरणांमध्ये २२० पेक्षा जास्त होता. यामुळे अनेक राखीव श्रेणीतील उमेदवार ज्यांनी सामान्य श्रेणीच्या कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले होते ते प्राथमिक निवड यादीत येऊ शकले नाहीत. त्यांच्या श्रेणीसाठी कट-ऑफ जास्त असल्याने या उमेदवारांना टायपिंग चाचणीला बसण्याची संधी नाकारण्यात आली. हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयात पोहोचले. तेथे श्रेणीनिहाय शॉर्टलिस्टिंग चुकीचे आहे असं  खंडपीठाने असा निकाल दिला. संविधानाच्या कलम १६(४) वंचित वर्गांसाठी आरक्षणाला परवानगी देते. मनमानी वर्गीकरणामुळे त्याचा उद्देशच कमकुवत होईल असं उच्च न्यायालयाने म्हटले.

आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना दुहेरी फायदे मिळाले आहेत हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. उमेदवाराला कमी पात्रता गुण किंवा वयात सूट असे फायदे मिळाले तरच आरक्षणाचा फायदा होतो. केवळ राखीव प्रवर्गाचा सदस्य असणे म्हणजे आरक्षणाचा लाभ घेणे असे मानले जाऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Open category not reserved; government jobs based on merit: SC

Web Summary : Supreme Court: Reserved category candidates with high merit eligible for open category government jobs. Merit-based selection crucial, not just category. Initial merit lists should include high-scoring reserved candidates.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय