फक्त मोदी व आदित्यनाथच भ्रष्टाचारमुक्त- बी. बी. शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:59 IST2018-06-11T04:59:44+5:302018-06-11T04:59:44+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच फक्त भ्रष्टाचारमुक्त आहेत, असे भाजपाचे उत्तरप्रदेशातील गोंडा येथील खासदार ब्रीज भूषण शरण यांनी म्हटले.

 Only Modi and Adityanath are non corrupt - B. Sharan | फक्त मोदी व आदित्यनाथच भ्रष्टाचारमुक्त- बी. बी. शरण

फक्त मोदी व आदित्यनाथच भ्रष्टाचारमुक्त- बी. बी. शरण

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच फक्त भ्रष्टाचारमुक्त आहेत, असे भाजपाचे उत्तरप्रदेशातील गोंडा येथील खासदार ब्रीज भूषण शरण यांनी म्हटले.
भाजपाच्या इतर नेत्यांबाबत मात्र अशी खात्री देता येत नाही, असे शरण शनिवारी जाहीरसभेत बोलताना म्हणाले. मोदी आणि योगी हे कोणत्याही स्वरूपाच्या भ्रष्टाचाराला थारा देत नाहीत आणि मी काय म्हणतोय त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. ‘मी म्हणालो की, ‘फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री (योगी) हेच भ्रष्टाचारापासून दूर आहेत. पक्षाच्या इतर नेत्यांबाबत मी तसे काही म्हणू शकत नाही.’शरण हे व्यवसायाने वकील असून पूर्वीही त्यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. त्यांनी याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी
यांची तुलना ‘भुंकणाऱ्या कुत्र्याशी’ केली होती.
गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील भाजपाचे बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सरकारी अधिकाºयाने लाच मागितल्यास त्याला जोड्यांनी मारा, असे आपल्या समर्थकांना सांगितले होते. अधिकाºयाने घूस (लाच) मागितल्यास त्याला घुसा (ठोसा) मारा, असे सिंह म्हणाले होते.

Web Title:  Only Modi and Adityanath are non corrupt - B. Sharan