गुजरातच्या सोमनाथ मंदिरात केवळ हिंदूनाच प्रवेश !
By Admin | Updated: June 3, 2015 17:04 IST2015-06-03T15:52:38+5:302015-06-03T17:04:11+5:30
गुजरातमधील पवित्र समजले जाणारे ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरात आता केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश करता येणार आहे.

गुजरातच्या सोमनाथ मंदिरात केवळ हिंदूनाच प्रवेश !
ऑनलाइन लोकमत
वेरावल (गुजरात ) दि. ३ - गुजरातमधील पवित्र समजले जाणारे ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरात आता केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश करता येणार आहे. हिंदू नसलेल्या समाजातील लोकांना जर मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांना मंदिर ट्रस्टीकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. मंदिरात बिगर हिंदू समाजातील लोकांनी प्रवेश करु नये अशी नोटीसच मंदिर परीसरात मंदिर ट्रस्टीकडून लावण्यात आली आहे.
श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर हे हिंदू समाजातील लोकांचे पवित्र तिर्थधामांपैकी एक आहे. हे मंदिर अत्यंत पवित्र असल्याने या मंदिरात केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश द्यायला हवा त्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची माहीती मंदिर ट्रस्टीतील एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. बिगर हिंदू समाजातील लोकांनाही मंदिरात प्रवेश करता येवू शकतो पण त्यांना त्याआधी परवानगी घेण्याची अट ठेवण्यात आली असून शिवरात्री व अन्य महत्वाच्या सणांच्यावेळी केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही या अधिका-याने सांगितले.