दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, तरच राहुल यांच्या नेतृत्वाला पाठिंबा - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:08 IST2019-05-10T05:07:35+5:302019-05-10T05:08:05+5:30
राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली.

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, तरच राहुल यांच्या नेतृत्वाला पाठिंबा - अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली.
ते म्हणाले की, जो पक्ष पुढचे सरकार स्थापन करेल, त्यात भाजपही असला तरी दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य करायला हवी. अर्थात आम्ही भाजपला कदापि पाठिंबा देणार नाही. राहुल गांधी यांच्याविषयी ते म्हणाले की, त्यांचा जर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून विचार होत असेल, तर मी त्यांना दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर सहाय्य करेन. याच अटीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पाठिंबा देईन.
‘मध्यप्रदेश, राजस्थानात जा’
यापूर्वी केजरीवाल यांनी प्रियांका गांधी दिल्लीत प्रचार करून त्यांचा वेळ वाया दवडत आहेत, अशी टीका केली होती. त्याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की, त्या दिल्लीत वेळेचा अपव्यय थांबवावा. त्या मध्यप्रदेश किंवा राजस्थानात प्रचार का करत नाहीत? उत्तर प्रदेशात त्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाविरुध्द तर दिल्लीत आपविरुध्द प्रचार करीत आहेत. कॉँग्रेसचा भाजपशी जेथे थेट सामना आहे, तेथे मात्र हे राहुल व प्रियांका गांधी जात नाहीत.