शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

"जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी"! 3 राज्यांतील भाजप विजयानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 18:27 IST

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत मतदार जनतेचे आभार मानले आहे. याच बरोबर, "जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत", असेही शाह यांनी म्हटले आहे. 

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. यांपैकी राजस्थान, मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा प्रचंड मोठा विजय झाला आहे. यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत मतदार जनतेचे आभार मानले आहे. याच बरोबर, "जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत", असेही शाह यांनी म्हटले आहे. 

जनतेच्या मनात केवळ मोदी - "जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत. आजच्या निवडणूक निकालांनी हे सिद्ध केले आहे की, तुष्टीकरण आणि जातीवर राजकारणाचे दिवस आता संपले आहेत. आता नवा भारत हा पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर मदतान करतो. या प्रचंड पाठिंब्याबद्दल मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनतेला नमन करतो. भाजपच्या या भव्य विजयाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन," असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.

सर्व मतदारांचे मनापासून आभार : पंतप्रधान मोदी -"जनतेला प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू."

तेलंगणातील जनतेचेही आभार मानले -आणखी एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जनतेचेही आभार मानले. 'तेलंगणातील माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी खूप आभार. गेल्या काही वर्षांमध्ये तुमचा आम्हाला पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही कौतुक करतो.'

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३