"गर्भपात करून मगच कॉलेजला ये"

By Admin | Updated: May 11, 2017 07:50 IST2017-05-11T07:33:10+5:302017-05-11T07:50:05+5:30

गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. युनिव्हर्सिटीतील महिला शिक्षिकेवर गंभीर आरोप

"Only after having a miscarriage, this college" | "गर्भपात करून मगच कॉलेजला ये"

"गर्भपात करून मगच कॉलेजला ये"

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 11- गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. युनिव्हर्सिटीतील महिला शिक्षिकेवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. एका गर्भवती विद्यार्थिनीवर गर्भपात करण्यास दबाव आणण्याचा शिक्षिकेवर आरोप आहे. अखेर त्या विद्यार्थिनीने पोलीस तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  वैशाली आचार्य असं त्या शिक्षिकेचं नाव असून तिच्यावर विद्यार्थ्यांचं शोषण करण्याचा आरोप आहे. 
 
"आज तक"ने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांकडून सिनेमांची तिकीटं किंवा डब्बा मागवणं हे वैशाली आचार्य यांचं रोजचं काम होतं. पण एक दिवस त्यांनी गर्भवती विद्यार्थिनीला थेट गर्भपात करण्याचा दबाव आणण्यास सुरूवात केली. या विद्यार्थिनीला "गर्भपात करून मगच कॉलेजला ये", असं वैशाली आचार्य यांनी बजावलं होतं. अखेर विद्यार्थिनीने पोलीस तक्रार केल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाला जाग आली.  
 
पोलीस तक्रारीनंतर कुलगुरुंनी वैशाली आचार्य यांना निलंबित केलं असून प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे.  

Web Title: "Only after having a miscarriage, this college"