एम्पलॉयमेंट एक्सचेंजची ऑनलाईन नोंदणी सुविधा
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
नोंदणी करणा-यांच्या संख्येत दरवर्षी एक लाखाने वाढ पुणे : जिल्हा व रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने (एम्पलॉयमेंट एक्सचेंज)नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या नोंदणी करता येते. ऑनलाईन सुविधेमुळे रोजगार कार्यालयामध्ये नोंदणी करणार्या विद्यार्थांची संख्या वाढली आहे. २०१२ मध्ये १ लाख ५८ हजार, २०१३ मध्ये २लाख ६६ हजार आणि २०१४ ...
एम्पलॉयमेंट एक्सचेंजची ऑनलाईन नोंदणी सुविधा
नोंदणी करणा-यांच्या संख्येत दरवर्षी एक लाखाने वाढ पुणे : जिल्हा व रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने (एम्पलॉयमेंट एक्सचेंज)नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या नोंदणी करता येते. ऑनलाईन सुविधेमुळे रोजगार कार्यालयामध्ये नोंदणी करणार्या विद्यार्थांची संख्या वाढली आहे. २०१२ मध्ये १ लाख ५८ हजार, २०१३ मध्ये २लाख ६६ हजार आणि २०१४ मध्ये ३लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या आकडेवारीवरून नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी एक लाखाने वाढ होत आहे.ऑनलाईनमुळे नोंदणी करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सहाय्यक संचालक राजेंद्र गोडबोले यांनी सांगितले. ते म्हणाले दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर यापुर्वी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची मोठी प्रमाणावर गर्दी होत असे. आता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर दरवर्षी पुण्यातील रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. नोंदणीसाठी लागणा-या लांबच-लांब रांगांमुळे विद्यार्थ्यांना अनेकदा नोंदणी न करताच परतावे लागत होते. परंतु, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने मागील तीन वर्षांपासून आधुनिकतेची कास धरली आहे. रोजगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी ६६६.ेंँं१ङ्म्नॅं१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध केल्याने विद्यार्थांना घरबसल्या नोंदणी करणे शक्य झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रात नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कार्यालयात येणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. परंतु, आता तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांत महा-ई-सेवा केंद्र सुरू केली आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून ऑनलाइनच्या माध्यमातून नोंदणी करता येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे. या सर्व सुविधेमुळे दरवर्षी रोजगार कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे. राजेंद्र गोडबोले यांनी सांगितले की, यापूर्वी विद्यार्थांना नोंदणी करण्यासाठी कार्यालयातच यावे लागत होते. त्यामुळे या कार्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थांनांही शहरात यावे लागत असे. पण आता ऑनलाईन सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्याही नोंदणी करता येते. ६६६.ेंँं१ङ्म्नॅं१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच तरुणांनी नोकरीसाठी संकेतस्थळ पहावे, असे आवाहनही गोडबोले यांनी केले आहे.