एक साल बाद... सीएम केजरीवाल
By Admin | Updated: February 11, 2015 06:32 IST2015-02-11T06:32:51+5:302015-02-11T06:32:51+5:30
राजीनामा दिल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेला अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

एक साल बाद... सीएम केजरीवाल
राजीनामा दिल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेला अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी राजीनामा दिला होता. उपोषण, आंदोलने, जाहीर सभा तसेच देश ढवळून काढणारे लोकपाल आंदोलन जिथे झाले त्या रामलीला मैदानावर पुन्हा ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. आपचे नेते आशुतोष यांनी याची औपचारिक घोषणा केली. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाणार आहे. केजरीवाल यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यावर त्यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी पत्र दिले.