शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:56 AM2021-11-26T08:56:55+5:302021-11-26T08:58:08+5:30

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपुर्तीनिमीत्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

One year of farmers protest on November 26, Programs across country, Delhi Police has stepped up security in the border areas | शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

Next

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला आज(शुक्रवार) 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा होत आहेत. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 'दिल्ली चलो' ची हाक दिली आहे, ज्या अंतर्गत दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी येतील. 

दिल्ली, सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही सीमांवर शेतकरी गेल्या वर्षभरापासून तळ ठोकून आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी 26-27 नोव्हेंबर रोजी 'दिल्ली चलो' कार्यक्रमाने आंदोलनाला सुरुवात झाली होती. केंद्राने नुकतेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील शेतकरी जल्लोष करणार आहेत. 
युनायटेड किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील विविध निषेध स्थळांवर हजारो शेतकरी पोहोचू लागले आहेत. दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमध्ये या निमित्ताने रॅली, धरणे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.

सीमेवर शेतकरी येणे सुरू

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, राजधानीच्या विविध सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सर्व सीमांसोबतच सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना कडक शब्दात कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि जो कोणी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसह निमलष्करी दल तैनात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून आंदोलनकर्ते शेतकरी ज्या ठिकाणी धरणे धरत आहेत त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात येणार आहे. विशेष पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था विभाग झोन-1) दीपेंद्र पाठक म्हणाले, पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारीही बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही व्यावसायिक पोलिसिंगचा वापर करत आहोत. यासंदर्भात गुरुवारी शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: One year of farmers protest on November 26, Programs across country, Delhi Police has stepped up security in the border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.