Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 09:28 IST2022-01-16T09:28:02+5:302022-01-16T09:28:34+5:30
आधी : डोस देता का? आता : डोस घेता का?

Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!
कोरोनाच्या पहिल्या लाटेने कहर केल्यानंतर १६ जानेवारी २०२१ रोजी जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर झुंबड पाहायला मिळाली. आता महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणासाठी आग्रह धरला जात आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरणाबद्दल जागृत केले जात आहे. रविवारी या महालसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती आहे. त्यानिमित्त ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांनी घेतलेला आढावा...
आव्हाने
अजूनही समाजातील काही स्तरामध्ये लसीबाबत गैरमसज.
एकही डोस न घेतलेल्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.
ओमायक्रॉन सारख्या झपाट्याने संसर्ग पसरवणाऱ्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
लस घेतलेल्यांना संरक्षण
लसीचे संरक्षण मिळालेल्या नागरिकांना तिसऱ्या लाटेचा फारसा तडाखा नाही.
लस घेऊनही ज्याना कोरोनाची लागण झाली त्यांना सौम्य लक्षणे
रुग्णालयात दाखल करण्याची वेळ अपवादानेच.