वाहनांच्या करारनाम्यात एकाला चुना फसवणूक : जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: March 15, 2016 00:34 IST2016-03-15T00:34:29+5:302016-03-15T00:34:29+5:30
जळगाव : वाहनांच्या करारनाम्यात एकाची १ लाख ९ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी महाबळ परिसरातील देवेंद्रनगरात राहणार्या एकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनांच्या करारनाम्यात एकाला चुना फसवणूक : जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा
ज गाव : वाहनांच्या करारनाम्यात एकाची १ लाख ९ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी महाबळ परिसरातील देवेंद्रनगरात राहणार्या एकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुनील मुथा (५८, रा.ख्वॉजामियॉँ चौक, जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी दीपक जयराम बोरसे (रा.देवेंद्रनगर, महाबळ) याने फिर्यादी सुनील मुथा यांच्याशी ऑगस्ट २०१४ मध्ये (एमएच १९ झेड १७१३) क्रमांकाची मालवाहू चारचाकी व (एमएच १९, ५२४८) क्रमांकाची कार अशा दोन्ही वाहनांचा भाड्याने वापरण्याबाबतचा करार केला होता. करारानुसार त्याची रक्कम दोन लाख ९ हजार रुपये ठरली होती. करार करताना दीपकने मुथा यांना १ लाख रुपये दिले होते. मात्र, उर्वरित १ लाख ९ हजार रुपयांची रक्कम तसेच वाहनांच्या भाड्याची रक्कम अदा न करता त्याने दोन्ही वाहने ठेवून घेत मुथा यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून दीपकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील करीत आहेत.