बडगाम येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 10:00 IST2018-03-25T08:40:51+5:302018-03-25T10:00:22+5:30
जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती.

बडगाम येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती.
#JammuAndKashmir: One terrorist gunned down in an encounter between security personnel & terrorists in Budgam's Arizal Village.
— ANI (@ANI) March 24, 2018
त्याआधी शनिवारी अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्याकडून एके-47 सह अनेक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी लष्कराने गेल्यावर्षीपासून ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. या कारवाईंतर्गत आतापर्यंत दोनशेहून अधिक मोठ्या कमांडरसह दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे.