शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोगाचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:19 IST

पंधरापैकी एक दगावण्याची शक्यता; पाच वर्षांपासून २२ लाख लोक कर्करोगाशी देत आहेत झुंज

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोग होण्याचा धोका असून, तसेच पंधरापैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो. जागतिक कर्करोग अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात कर्करोगाचे नवीन ११.६ लाख रुग्ण आढळले. या अवधीत ७८४,८०० जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर गेल्या पाच वर्षांपासून २२ लाखांहून अधिक लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. एकूण भारताच्या १३५ कोटी लोकसंख्येभोवती कर्करोगाचा जीवघेणा विळखा घट्ट होत असल्याचे दिसते.

जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोग दिन आणि कर्करोग विशेष संसोधन आंतरराष्ट्र्रीय संस्थेने (आयएआरसी) मंगळवारी दोन अहवाल जारी केले आहेत. एका अहवालाचा उद्देश कर्करोगासाठी जागतिक कार्यक्रम ठरविणे आहे, दुसरा अहवाल संशोधन आणि प्रतिबंध यावर भर देणारा आहे. या अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला कर्करोग होण्याचा धोका असून, पंधरा भारतीयांपैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो.

भारतात मुख्यत्वे सहा प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात. १ लाख ६२ हजार ५०० जणांना स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळले. मुख कर्करोगाचे रुग्ण १ लाख २० हजार, तर ९७ हजार जण मणक्याचा कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळले. पोटाच्या कर्करोगाचे ५७ हजार रुग्ण आढळले असून, आतडे-मलमार्ग कर्करोग्रस्तांची संख्या ५७ हजार आहे. फुफ्फु साचा कर्करोग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या ६८ हजार आहे. एकूण कर्करोगाच्या नवीन रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ४९ टक्के आहे.गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यासह सर्वसंबंधितांनी एकत्र काम केल्यास येत्या एका दशकात ७० लाख लोकांना कर्करोगापासून वाचविता येऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक ट्रेडॉम अ‍ॅडहनम गेब्रायसेस यांनी सांगितले.

अहवालानुसार जगात धूम्रपान करणाऱ्यांपैकी ८० टक्के धूम्रपान करणारे अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांतील आहेत.पुरुषांत एकूण ५ लाख ७० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आहेत. यात ९२ हजार मुखकर्करोग, ४९ हजार (फुफ्फु साचा कॅन्सर), ३९ हजार (पोटाचा कॅन्सर) आणि आतडे-मलमार्ग कॅन्सरच्या नवीन कर्करुग्णांची संख्या ३७ हजार आहे. भारतातील विकसित राज्यात आणि शहरी भागात आतडे-मलमार्ग कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, तसेच स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसते.

महिलांमध्ये ५ लाख ८७ हजार नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळले आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कॅन्सरचे १७ नवीन रुग्ण आहेत. तंबाखूमुळे भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा संबंध सामजिक आणि आर्थिक स्थितीशी आहे. पुरुषांत प्रामुख्याने मुख कर्करोग आणि महिलांमध्ये मानेच्या मणक्याच्या कर्करोगाचे अधिक प्रमाण आहे.अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण सेवा क्षेत्रातील कमी गुंतवणुकीमुळे २०४० पर्यंत कर्करुग्णांची संख्या ८१ टक्के वाढण्याची शक्यता आहे.जगभर धूम्रपान करणाऱ्यांपैकी ६४ टक्के लोक फक्त देशातील आहेत, तर जगभरात धूम्रपान करणाºया पुरुषांपैकी ५० टक्के लोक चीन, भारत, इंडोनेशियात आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारतdocterडॉक्टर