बोरीपार्धीला निवडणुकीच्या वादातून एकाला मारहाण

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:37+5:302015-08-19T22:27:37+5:30

केडगाव : बोरीपार्धी (ता. दौंड) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका उमेदवाराला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सचिन नेवसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की माझा भाऊ अनिल बाबूराव नेवसे हे ग्रामपंचायत बोरीपार्धी निवडणुकीत इच्छुक होते. माझ्या भावाने बोरीपार्धी ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेतली नाही, म्हणून बाळासाहेब सोडनवर यांनी माझ्या भावाला बोरीपार्धी येथे ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.१५च्या सुमाराला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपी बाळासाहेब सोडनवर यांचे नातेवाईक २ मोटारसायकलवर येऊन सुनील सोडनवर, भानुदास सोडनवर, नितीन सोडनवर, विशाल टेंगले, अमित टेंगले सर्व राहणार बोरीपार्धी यांनी माझ्या भावाला लाकूड, बांबू व दगडाने मारहाण केली. त्यानंतर जखमी अनिल नेवसे यांना पुणे येथील ससून रुग्णालया

One person was beaten to death by election dispute in Bori Pardhdi | बोरीपार्धीला निवडणुकीच्या वादातून एकाला मारहाण

बोरीपार्धीला निवडणुकीच्या वादातून एकाला मारहाण

डगाव : बोरीपार्धी (ता. दौंड) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका उमेदवाराला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सचिन नेवसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की माझा भाऊ अनिल बाबूराव नेवसे हे ग्रामपंचायत बोरीपार्धी निवडणुकीत इच्छुक होते. माझ्या भावाने बोरीपार्धी ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेतली नाही, म्हणून बाळासाहेब सोडनवर यांनी माझ्या भावाला बोरीपार्धी येथे ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.१५च्या सुमाराला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपी बाळासाहेब सोडनवर यांचे नातेवाईक २ मोटारसायकलवर येऊन सुनील सोडनवर, भानुदास सोडनवर, नितीन सोडनवर, विशाल टेंगले, अमित टेंगले सर्व राहणार बोरीपार्धी यांनी माझ्या भावाला लाकूड, बांबू व दगडाने मारहाण केली. त्यानंतर जखमी अनिल नेवसे यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी (दि. १७) यवत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

०००

Web Title: One person was beaten to death by election dispute in Bori Pardhdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.