काश्मीरमध्ये चकमकीत एक जवान शहीद, दोन दहशतवादी ठार
By Admin | Updated: December 4, 2015 15:49 IST2015-12-04T15:49:18+5:302015-12-04T15:49:18+5:30
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर,एक जवान शहीद झाला

काश्मीरमध्ये चकमकीत एक जवान शहीद, दोन दहशतवादी ठार
ऑनलाईन लोकमत
श्रीनगर, दि. ४ - उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर, एक जवान शहीद झाला. हंडवारामधील वाडेर बाला गावात दोन ते तीन सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी या भागात शोधमोहिम सुरु केली.
लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु करताच जवानांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या मोहिमेत दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर, एक जवान जखमी झाला.