देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अनेक ठिकाणी औषध आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेकडे पाहता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पीएम केयर्स फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बुधवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांना यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.
Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 17:55 IST
Coronavirus In India : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.
Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर
ठळक मुद्देपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय.पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.