अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30
नाशिक : महिरावणीहून तळेगावला पायी जाणार्या इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ मयत इसमाचे नाव लक्ष्मण रडका मोर (३५, रा़ तेरी चिखली, ता़ कपराड, जि़ बलसाड, गुजरात) असे आहे़ गुरुवारी सायंकाळी ते महिरावणीहून तळेगाव येथे पायी जात होते़ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़धूम यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
न शिक : महिरावणीहून तळेगावला पायी जाणार्या इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ मयत इसमाचे नाव लक्ष्मण रडका मोर (३५, रा़ तेरी चिखली, ता़ कपराड, जि़ बलसाड, गुजरात) असे आहे़ गुरुवारी सायंकाळी ते महिरावणीहून तळेगाव येथे पायी जात होते़ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़धूम यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)