ट्रक, आयशर अपघातात एक ठार
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:02+5:302015-03-08T00:31:02+5:30
बळी मंदिराजवळील अपघात

ट्रक, आयशर अपघातात एक ठार
ब ी मंदिराजवळील अपघातनाशिक : मुंबईस जाणार्या ट्रकला पाठीमागून आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत चालक शकिल अहमद मोईनुद्दीन अहमद (४५, साईबाबानगर, धारावी) मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिराजवळ घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरून शनिवारी (दि़७) पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने ट्रक (एमएच १८ एए ८२१८) जात होता़ यावेळी पाठीमागून आलेल्या आयशरने (एमएच ०४ जीआर ००९२) ट्रकला जोरदार धडक दिली़ यामध्ये आयशरचालक शकिल अहमद मोईनुद्दीन अहमद हा गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले़ दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)