शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चेकपोस्ट टाळण्यासाठी बाईक सुस्साट पळवली, एकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा अपघात CCTVमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:30 IST

चेकपोस्ट टाळण्यासाठी दुचाकी भरधाव वेगानं पळवली; चेकपोस्टच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

मंचेरिअल: तपासणी टाळण्यासाठी बाईक भरधाव वेगानं पळवणं दोन तरुणांना महागात पडलं आहे. तेलंगणातील मंचेरिअल जिल्ह्यात झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे. २२ मे रोजी तपालपूर गावात हा भीषण अपघात झाला.मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. २२ मे रोजी एक दुचाकीस्वार इथून अतिशय भरधाव वेगानं निघाला होता. त्याच्या मागे दुचाकीवर आणखी एक जण होता. वन विभागाचा अधिकारी चेकपोस्टजवळ उभा होता. वेगानं येणारी दुचाकी पाहून अधिकाऱ्यानं हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही दुचाकीस्वारानं वेग कमी केला नाही. चेकपोस्टवरील तपासणी चुकवण्यासाठी त्यानं वेग आणखी वाढवला. दुचाकीस्वार वेग कमी करण्याऐवजी वाढवत असल्याचं लक्षात येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यानं चेकपोस्टवर शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती चेकपोस्टला धडकू नये यासाठी त्यानं शेवटपर्यंत प्रयत्न केले. चेकपोस्ट जवळ येताच दुचाकी चालवत असलेल्या व्यक्तीनं मान खाली झुकवली आणि धडक टळली. मात्र त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकला आणि तो चेकपोस्टला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यानं प्राण सोडला. सुदावेनी व्यंकटेश गौड असं त्याचं नाव असल्याची माहिती नंतर समोर आली. तर दुचाकी चालवत असलेल्या व्यक्तीचं नाव बंडी चंद्रशेखर असून तो कोत्थाकुम्मूगुदेम गावाचा रहिवासी आहे.