गोवा येथील अपघातात सावंतवाडीतील एक ठार
By Admin | Updated: May 12, 2014 21:34 IST2014-05-12T21:34:59+5:302014-05-12T21:34:59+5:30
दुचाकी-कार धडक; कारचालक कोल्हापूरचा

गोवा येथील अपघातात सावंतवाडीतील एक ठार
द चाकी-कार धडक; कारचालक कोल्हापूरचाबांदा : मुंबई-गोवा महामार्गावर तांबोसे (ता. पेडणे, गोवा) येथे दुचाकी व इंडिका कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चराठा-सावंतवाडी येथील मुकादम विलास लक्ष्मण चव्हाण (वय ४५) हे जागीच ठार झाले. आज (सोमवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चव्हाण हे गेली पंचवीस वर्षे सावंतवाडीत मुकादम असून, त्यांच्या निधनाने सावंतवाडीवर शोककळा पसरली आहे.चव्हाण आपल्या ताब्यातील दुचाकीने (एमएच ०७ आर २१२३) बांद्याहून पेडण्याच्या दिशेने जात होते. याचवेळी पेडण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या कारने (एमएच ०९ सीएम २१८९) ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. या धडकेने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्कस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.विलास यांची सेंटिं्रग कामासाठी लागणारी मशीन म्हापसा येथे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली होती. तेथे पत्नीला थांबवून मशीनसाठी लागणारे पैसे आणण्यासाठी ते सावंतवाडीत आले होते. पैसे घेऊन ते पुन्हा म्हापसा येथे जात असतानाच हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीतील ठेकेदारांनी घटनास्थळी धाव घेतली. पेडणे पोलिसांनी कारचालक बाजीराव गजानन शिंदे (रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. विलास चव्हाण हे मूळचे बेळगाव सौदती येथील असून, ते गेली २५ वर्षे सावंतवाडी शहरात मुकादमाचा व्यवसाय करीत होते. सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. मात्र, हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवला होता.सायंकाळच्या सुमारास विलास चव्हाण यांचा मृतदेह सावंतवाडी वाघाचागुडा येथील निवासस्थानी आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह सौदत्ती-बेळगाव येथे नेण्यात आला. यावेळी सावंतवाडीतील बरेच सामाजिक तसेच राजकीय, व्यावसायिक मंडळी अंत्यदर्शनासाठी जमले होते.विलास चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)चौकट १शुन्यातून विश्व अपघाती मृत्यूमुखी पडलेले विलास चव्हाण हे पंचवीस वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले. तेव्हा त्यांच्याजवळ राहण्यासाठी जागाही नव्हती. शहरात अनेक ठिकाणी झोपडीत ते राहत होते. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय वाढवत अलीकडे शहरातच अलिशान बंगला बांधला होता.