मोटारसायकल-बस अपघातात एक ठार
By Admin | Updated: May 18, 2014 00:24 IST2014-05-17T23:52:25+5:302014-05-18T00:24:45+5:30
येवला : कन्नड बस डेपोच्या गाडीवर मोटरसायकल धडकल्याने मोटार सायकल मालकाचा जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

मोटारसायकल-बस अपघातात एक ठार
येवला : कन्नड बस डेपोच्या गाडीवर मोटरसायकल धडकल्याने मोटार सायकल मालकाचा जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
येवला-नागडे रेल्वेगेटजवळ ५०० मीटर अंतरावर, कन्नड बस आगाराची एम.एच. ४० एन- ९७५१ या क्रमांकाची बस कन्नडहून येवल्याकडे येत होती. येथील वळणावरून अमोल कैलास बागल रा. नगरसुल हा एम.एच. १५ सी.जी. ६८६१ या बजाज डिस्कव्हर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून येवल्याहून नागडे या गावाला जात असतांना, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो बसवर जाऊन धडकला. धडक एवढी जबरदस्त होती की, अमोल बागल हा २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला.
याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. स.पो.निरीक्षक पांडुरंग खेडकर, पो. उपनिरीक्षक एस.आर.बैरागी, पो.ह. शिवा शिंदे आदि तपास करीत आहे. (वार्ताहर)