दुचाकी नदीत कोसळून एक ठार
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:17+5:302015-02-14T23:52:17+5:30
नाशिक : दुचाकी नदीपात्रात पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री तपोवनाजवळ घडली़ मनोज सुदर्शन शर्मा (३६), बुद्धराम रामजित शर्मा (३०), हिरा विरेंद्र शर्मा (२२, तिघेही रा़पाथर्डी फाटा) हे कामानिमित्त तपोवनात गेले होते़ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कायनेटिक दुचाकीवरून (एम़एच़१५, एपी ११९८) वर येत असताना कन्नमवार पुलाजवळून दुचाकी नदीपात्रात कोसळून अपघात झाला़ यामध्ये मनोज शर्मा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी बुद्धराम शर्मा व हिरा शर्मा हे दोघे गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

दुचाकी नदीत कोसळून एक ठार
न शिक : दुचाकी नदीपात्रात पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री तपोवनाजवळ घडली़ मनोज सुदर्शन शर्मा (३६), बुद्धराम रामजित शर्मा (३०), हिरा विरेंद्र शर्मा (२२, तिघेही रा़पाथर्डी फाटा) हे कामानिमित्त तपोवनात गेले होते़ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कायनेटिक दुचाकीवरून (एम़एच़१५, एपी ११९८) वर येत असताना कन्नमवार पुलाजवळून दुचाकी नदीपात्रात कोसळून अपघात झाला़ यामध्ये मनोज शर्मा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी बुद्धराम शर्मा व हिरा शर्मा हे दोघे गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)