केरीतील अपघातात एकजण जखमी
By Admin | Updated: January 20, 2016 01:51 IST2016-01-20T01:51:36+5:302016-01-20T01:51:36+5:30
पर्ये : केरी-सत्तरी येथे मंगळवारी रात्री तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास चोर्लाघाटमार्गे बेळगावहून गोव्याकडे निघालेल्या के.ए.22-3661 आणि जी.ए.01-6656 या दोन मालवाहू ट्रकनी केरी जुने बसस्थानक येथे उभ्या असलेल्या जी.ए.05-3542 या क्रमांकाच्या सेलेरियो कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात सेलेरियो कारमध्ये बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. या दोन ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की, या कारला धडक हे ट्रक रस्त्यालगतच्या एका घराच्या कुंपणावर जाऊन धडकले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, या दोन्ही ट्रकचे चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांनी दोन्

केरीतील अपघातात एकजण जखमी
प ्ये : केरी-सत्तरी येथे मंगळवारी रात्री तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास चोर्लाघाटमार्गे बेळगावहून गोव्याकडे निघालेल्या के.ए.22-3661 आणि जी.ए.01-6656 या दोन मालवाहू ट्रकनी केरी जुने बसस्थानक येथे उभ्या असलेल्या जी.ए.05-3542 या क्रमांकाच्या सेलेरियो कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात सेलेरियो कारमध्ये बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. या दोन ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की, या कारला धडक हे ट्रक रस्त्यालगतच्या एका घराच्या कुंपणावर जाऊन धडकले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, या दोन्ही ट्रकचे चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांनी दोन्ही चालकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.