शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सातपैकी एक! भाजपाने त्रिपुरातून खाते उघडले; पोटनिवडणुकांत दोन ठिकाणी आघाडी, पण घोसीमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:23 IST

उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे.

सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यापैकी त्रिपुराच्या धनपुरमध्ये भाजपाने खाते उघडले आहे. अन्य दोन मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत, परंतू उत्तर प्रदेशच्या घोसीमध्ये भाजपाला सपाटून मार खावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे.

धनपूरमध्ये भाजपच्या बिंदू देबनाथ यांना 30017 तर माकपच्या कौशिक चंदा यांना 11146 मते मिळाली. भाजपला 18871 मतांच्या फरकाने ही जागा जिंकता आली आहे. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये सहाव्या फेरीत भाजप 1700 मतांनी पुढे आहे. पार्वती दास यांना 15253 मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या बसंत कुमार 13553 मते मिळाली आहेत. इथे कांटे की टक्कर पहायला मिळत आहे. 

त्रिपुरातील आणखी एक जागा भाजपाच्या पारड्यात जाताना दिसत आहे. बॉक्सानगर भाजपचे तफज्जल हुसेन 25478 मतांनी आघाडीवर आहेत. सीपीआय(एम)चे मिजान हुसेन यांना फक्त २२७३ मते मिळाली आहेत. 

घोसीमध्ये सपाचा उमेदवार मोठी आघाडी घेत आहे. सहाव्या फेरीनंतर सपा 8557 मतांनी आघाडीवर आहे. सपा उमेदवार सुधाकर सिंह यांना 22785 तर भाजपचे दारा सिंह चौहान यांना 14228 मते मिळाली आहेत. 

पश्चिम बंगालच्या धुपगुरीमध्ये टीएमसी आघाडीवर असली तरी हे अंतर खूपच कमी आहे. तीन फेऱ्यांनंतर तृणमूलला 11739 मते मिळाली आहेत. तर भाजप 10620 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीकडे 1119 मतांची आघाडी आहे. 

केरळच्या पुथुपल्लीमध्ये काँग्रेस 16864 मतांनी आघाडीवर आहे. सहाव्या फेरींनंतरही सीपीआय(एम)चे जॅक सी थॉमस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. झारखंडच्या डुमरीमध्ये NDA समर्थित AJSU पक्षाच्या उमेदवार यशोदा देवी या 1341 मतांनी मागे पडल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी या आघाडीवर आहेत. परंतू तिथेही पारडे पालटू शकेल अशी स्थिती आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी