देशभरात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी मिळणार पगार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 05:19 AM2019-11-16T05:19:16+5:302019-11-16T05:19:23+5:30

देशभरात ‘वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

One day salary for employees across the country? | देशभरात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी मिळणार पगार?

देशभरात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी मिळणार पगार?

Next

एस. के. गुप्ता 
नवी दिल्ली : देशभरात ‘वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार म्हणाले की, देशभरात सर्वत्र कामगारांचा पगार दर महिन्याच्या एका विशिष्ट दिवशीच होणे आवश्यक आहे. खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी हे हिताचे ठरेल.
ते म्हणाले की, ‘वन नेशन-वन डे पे' योजनेसंदर्भातील कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इच्छा आहे. सेंट्रल असोसिएशन फॉर प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, सर्वच क्षेत्रामध्ये किमान समान वेतनासाठी काही नियमही बनविणार आहे. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अगदी प्रारंभापासूनच कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालीे. व्यापार प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी देशातील विविध क्षेत्रांकरिता सिंगल पेज मेकॅनिझम तयार केला आहे.
>१३ कामगार कायद्यांचे विलीनीकरण
संतोष गंगवार यांनी सांगितले की, आॅक्युपेशनल सेफ्टी, आरोग्य व कामाच्या ठिकाणची स्थिती (ओएसएच) यासंदर्भातील कायदा लागू करणार आहे. त्यामध्ये वेतनाच्या मुद्द्याचाही अंतर्भाव आहे. या गोष्टींशी संबंधित १३ कामगार कायद्यांचे विलिनीकरण करून एकच कायदा बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांना या कायद्यातील तरतुदींचा लाभ मिळू शकेल.

Web Title: One day salary for employees across the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.