कोलकात्यातील डम डम नगरमध्ये स्फोट, एका मुलाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:13 IST2018-10-02T14:11:37+5:302018-10-02T14:13:30+5:30

शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या डम डम नगरमधील बाजारपेठेत स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

one child killed In explosion In kolkata | कोलकात्यातील डम डम नगरमध्ये स्फोट, एका मुलाचा मृत्यू  

कोलकात्यातील डम डम नगरमध्ये स्फोट, एका मुलाचा मृत्यू  

कोलाकाता : शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या डम डम नगरमधील बाजारपेठेत स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  डम डम नगरमधील बाजारपेठेतील एका फळांच्या दुकानासमोर स्फोट झाला. हा स्फोट सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला. यामध्ये एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. तसेच, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





 

 

Web Title: one child killed In explosion In kolkata

टॅग्स :Blastस्फोट