प्रवाशांनीच पकडले पॉकेट चोरास एकास अटक : बसस्थानकातील घटना
By Admin | Updated: December 14, 2014 00:09 IST2014-12-12T23:49:08+5:302014-12-14T00:09:32+5:30
औसा : मागील काही दिवसांपासून येथील बसस्थानकात पाकिट मारीसह महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ परंतु, बसस्थानकातील या घटनांची तक्रार पोलिस ठाण्यापर्यंत जात नाही़ गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एक प्रवाशी येथील बसस्थानकातून लातूरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एकाने त्यांच्या खिशातील ३ हजार रूपये काढले़ ही बाब सदरील प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने या पाकिटमारास पकडले़ पाकिटमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़

प्रवाशांनीच पकडले पॉकेट चोरास एकास अटक : बसस्थानकातील घटना
औसा : मागील काही दिवसांपासून येथील बसस्थानकात पाकिट मारीसह महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ परंतु, बसस्थानकातील या घटनांची तक्रार पोलिस ठाण्यापर्यंत जात नाही़ गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एक प्रवाशी येथील बसस्थानकातून लातूरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एकाने त्यांच्या खिशातील ३ हजार रूपये काढले़ ही बाब सदरील प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने या पाकिटमारास पकडले़ पाकिटमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़
औसा येथील विजय कुर्ले हे गुरुवारी लातूरकडे निघाले होते़ लातूरकडे जाणारी बस आल्यानंतर ते बसमध्ये चढत असताना त्यांच्या पाठीमागील खिशात हात घालून सोमनाथ जाधव (रा़ चर्हाटा, जि़ बीड) याने तीन हजार रूपये काढले़ इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांनी त्यास पकडले़ दरम्यान, त्याचे अन्य तीन साथीदार पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ आरोपी सोमनाथ जाधव यास पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याने औसा पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक केली़ पुढील तपास पोहेकॉ गोरे हे करीत आहेत़
औसा येथील बसस्थानकामध्ये मागील काही दिवसांपासून पाकिटमारी व महिलांच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत़ पण पोलिस मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ बसस्थानकावर पोलिसांची ड्युटी दिल्याचे सांगण्यात येते़ पण हे कर्मचारी कधी असतात हा संशोधनाचा विषय आहे़ बसस्थानकात पाकिटमारीच्या घटना घडल्या की, अनेक प्रवाशी पोलिसांची कटकट नको म्हणून फिर्याद देण्याचे टाळतात़ बसस्थानकात कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा,अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे़