मालवण समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद जहाज

By Admin | Updated: July 26, 2015 23:38 IST2015-07-26T23:38:27+5:302015-07-26T23:38:27+5:30

मालवण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग किनारप˜ीवर पंधरा दिवसांपूर्वी दोन संशयास्पद जहाजे दिसल्याने सागरी सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली होती. ही घटना ताजी असताना मालवण येथील खोल समुद्रात रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा संशयास्पद जहाज दिसून आले. पोलीस यंत्रणा व सागरी सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

Once again suspicious ship in the sea of ​​Malvan | मालवण समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद जहाज

मालवण समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद जहाज

लवण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग किनारप˜ीवर पंधरा दिवसांपूर्वी दोन संशयास्पद जहाजे दिसल्याने सागरी सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली होती. ही घटना ताजी असताना मालवण येथील खोल समुद्रात रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा संशयास्पद जहाज दिसून आले. पोलीस यंत्रणा व सागरी सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
याबाबत मालवण पोलिसांनी कोस्टगार्ड विभागाला माहिती दिली आहे. हे जहाज मालवाहू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समजू शकली नाही. (वार्ताहर)

Web Title: Once again suspicious ship in the sea of ​​Malvan