शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:08 IST

महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत.

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार समाजमाध्यमांवर फसवणुकीचे रोज नवनवे फंडे बाहेर काढत असून, यात आता त्यांनी महिलांना गर्भवती करण्याच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. यात अनेकांना फटका बसला असला तरीही ते इभ्रत जाईल या भीतीने ते पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत.

काय असते जाहिरातीमध्ये?सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर महिलांना गर्भवती करण्याच्या नावाखाली ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली जाहिरात देतात. यात महिलांना गर्भवती करा अन् लाखो रुपये मिळवा, असे म्हटलेले असते. यात आपली माहिती गुप्त ठेवण्यासह याचा संपूर्ण खर्च महिलेकडून करण्यात येईल, असे सांगितले जाते. 

गंडा कसा?- तरुण जाळ्यात अडकले की त्यांना  ‘प्रेग्नंट जॉब’चा सर्व खर्च महिला करेल. सर्व वस्तूंची बुकिंग तरुणीकडून होईल, असे सांगितले जाते.- यात नोंदणीसाठी ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. यानंतर महिलेचा फोटो आणि व्हिडीओ दाखवून बोलणेही करून दिले जाते.

प्रकरण १- हरयाणाच्या नूंहमध्ये सायबर पोलिसांनी बुराका, पिनंगवा यांना २९ सप्टेंबर रोजी पकडले होते. - तपासात आरोपींनी महाराष्ट्रात ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी पोलिसांच्या भीतीने आपला मोर्चा राजस्थान आणि हरयाणाकडे वळवला. आतापर्यंत त्यांना शेकडो लोकांची फसवणूक केली आहे.

प्रकरण २- बिहारच्या नवादामध्ये याच प्रकारची फसवणूक करणारे आरोपी २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले.- ३ पैकी १ आरोपीने गंडा घालण्याचे ट्रेनिंग घेत अनेकांची फसवणूक केली. या आरोपींनीही बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे ४०० पेक्षा अधिक जणांना गंडा घातला आहे.३-४००० रुपये सुरुवातीला नोंदणी आणि जीएसटीच्या नावाखाली वसूल केले जातात.९०% पेक्षा अधिक अल्पवयीन तरुणांचा या सायबर गुन्हेगारीत समावेश. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjobनोकरीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया