शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:52 AM

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीबीआयने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि या गुन्ह्यात गुंतलेल्या एजंट्सच्या अड्ड्यांवर छापे टाकले.

नवी दिल्ली : नोकरीच्या नावाखाली तरुणांना रशियन सैन्यात भरती करणाऱ्या लोकांचे नेटवर्क भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, भाजपा नगरसेविकेचा मुलगा भारतीय तरुणांना रशियन सैन्यात कथितपणे पाठवण्यासाठी विद्यार्थी व्हिसाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या रडारवर आला आहे. 

इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील धार येथील नगरसेविका अनिता मुकुट यांचा मुलगा सुयश मुकुट हा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. मात्र, सध्या या प्रकरणी सुयश मुकुटची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. सूत्रांचा हवाल्यानुसार, मुकुट कुटुंब मूळचे इंदूरचे आहे आणि सध्या ते धार येथे राहतात, जेथे सुयशचे वडील रमाकांत मुकुट स्थानिक रुग्णालयात जनरल फिजिशियन म्हणून काम करतात. याबाबत वृत्तपत्राने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

भाजपाचे धार जिल्हाध्यक्ष मनोज सोमाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनिता मुकुट यांच्या मुलाविरोधातील सीबीआय खटल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सवरून मिळाली. गेल्या वर्षी मी पदभार स्वीकारला, तेव्हा त्या आधीच नगरसेवक होत्या. मी एवढेच म्हणेन की कायद्याला काम करू द्या, असे मनोज सोमाणी म्हणाले. तसेच, धारचे मुख्य पालिका अधिकारी (सीएमओ) निशिकांत शुल्का यांनी सांगितले की, अनिता मुकुट यांची नगरसेविका म्हणून ही पहिलीच टर्म आहे.

सुयश मुकुटविषयी एक्सवरून माहितीसुयश मुकुटच्या एक्सवर (X) हँडलवरील बायोमध्ये म्हटले आहे की, 24X7 आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेसचे अध्यक्ष आणि संस्थापक असल्याचे लिहिले आहे. आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेस हे भारतीय विद्यार्थ्यांना रशियामध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) वैद्यकीय अभ्यासात प्रवेश मिळवण्यास मदत करते.

180 लोकांना रशियाला पाठवल्याचा आरोपसुयश मुकुटच्या 24X7 आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेसवर 180 लोकांना रशियाला पाठवल्याचा आरोप आहे, त्यापैकी बहुतेकांना विद्यार्थी व्हिसावर पाठवण्यात आले होते. सीबीआय एफआयआरनुसार, एजंटांनी भारतीयांना रशियन विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो, अशी फसवणूक केली होती. दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीतील सफदरजंग येथील कंपनीचे कार्यालय केवळ कागदावर!एफआयआरमध्ये इतर कंपनी 24X7 आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचेही नाव नाही, जी जून 2022 मध्ये सुयश मुकुट आणि त्याचा भाऊ पार्थ मुकुट यांनी संचालक म्हणून उघडली होती. कंपनीचा नोंदणीकृत पत्ता दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हमधील तळघरात असल्याचे सांगण्यात आले, परंतु जेव्हा इंग्रजी वर्तमानपत्र त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेथे कोणतेही कार्यालय आढळले नाही. निवासी इमारतीच्या मालकाने कंपनी किंवा मुकुट कुटुंबाविषयी कोणतीही माहिती नसल्याचा स्पष्टपणे इन्कार केला.

फसवणूक करून रशियन सैन्यात भारतीय तरुणांची भरती हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीबीआयने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि या गुन्ह्यात गुंतलेल्या एजंट्सच्या अड्ड्यांवर छापे टाकले. सीबीआयने या प्रकरणी अनेक खासगी व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दिल्ली आणि मुंबईसह 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारीत 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या ठिकाणांवरून भरतीशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाCBIगुन्हा अन्वेषण विभाग