Omicron Update: ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 20:35 IST2021-12-21T20:33:33+5:302021-12-21T20:35:15+5:30
Is corona Vaccine effective on Omicron variant: कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत.

Omicron Update: ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले
कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत. यामुळे कोरोना लस नव्या व्हेरिअंटवर कितपत प्रभावी आहे, याबाबतचा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत लिखित उत्तर दिले आहे.
सरकारने मंगळवारी हे उत्तर दिले. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर सध्या उपलब्ध असलेल्या लशींचा प्रभाव कमी होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मांडवियांनी लिखित उत्तरात म्हटले की, उपलब्ध आकडे सीमित आहेक, लसी कितपत प्रभावी आहे यावर अद्याप अभ्यास झालेला नाहीय.
देशवासियांना दिल्या जात असलेल्या कोरोना लसी ओमायक्रॉनवर किती प्रभावी आहेत, याबाबत संसदेत विचारण्यात आले होते. विविध देशांमध्ये कोरोनाचा हा व्हेरिअंट वेगाने पसरत असल्याचे वृत्त आहे. यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंधणे आणण्यात आली आहेत. 28 नोव्हेंबरला नियम जारी करण्यात आले आहेत. यात दोन दिवसांनी पुन्हा बदल करण्यात आल्याचे मांडविय म्हणाले.
या नियमांनुसार कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या आधारे धोकादायक देशांचे पुन्हा वर्गीकरण करण्यात आले. आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या, सात दिवस सक्तीचे क्वारंटाईन देखील करण्यात आले आहे.
संबंधित बातमी...