Omicron News: ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय? 'या' तीन गुड न्यूजमुळे दूर होईल तुमची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:15 IST2021-12-20T15:15:15+5:302021-12-20T15:15:38+5:30
Omicron News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा दीडशेच्या पुढे

Omicron News: ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय? 'या' तीन गुड न्यूजमुळे दूर होईल तुमची चिंता
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटन, अमेरिकेत ओमायक्रॉननं हाहाकार माजवला आहे. भारतात २ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. सध्याच्या घडीला देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १५० च्या पुढे गेला आहे. तर राज्यातील बाधितांचा आकड्यानं पन्नाशी पार केली आहे.
सुपर इम्युनिटी तयार होत असल्यानं दिलासा
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असलेल्यांच्या शरीरात सुपर इम्युनिटी तयार होत आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोनाची बाधा होणाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचं प्रमाण १ हजार ते २ हजार टक्क्यांनी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या ओरेगाव हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये २६ लोकांच्या अँटिबॉडीजचा अभ्यास करण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेतून गुड न्यूज
ओमायक्रॉनमुळे होणारं संक्रमण जास्त गंभीर नसल्याचं आकडेवारी सांगते. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांपैकी काही जणांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. ऑक्सिजनची गरज लागलेल्या रुग्णांची संख्यादेखील कमी आहे.
पॅनडेमिक ते एनडेमिक
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सध्याचा प्रसार पाहता येणाऱ्या वर्षांत सार्स-कोव २ व्हायरस एनडेमिक डिजीज होईल. जेव्हा विषाणूचा प्रसार जास्त होतो, तेव्हा त्याची तीव्रता कमी होते. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक संक्रामक आहे. मात्र त्याची लागण होणाऱ्यांना असलेला धोका जास्त नाही.